गट शेतीसाठी शाशनाकडुन एक कोटींचे अनुदान।सरकारची नवी योजना।2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष।
गट शेतीसाठी शाशनाकडुन एक कोटिचे अनुदान
याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. आणि ही माहिती सर्व शेतकरी मित्रांना पाठवावी.धन्यवाद।
~ कृषी सल्हागार,एस.व्हि.धोते.
पुणे – जमिनीचे विभाजन टाळण्यासाठी, उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती करणे, मार्केटींगच्या सुविधा उपलब्ध करून देणे, शेती मालावर प्रक्रिया करणे व शेती पुरक व जोड धंदा करणे यासाठी शासनाने गट शेती ही योजना आणली आहे. यासाठी किमान 20 शेतकऱ्यांकडे 100 एकर जमिन असणे आवश्यक असून या गटशेतीसाठी शासन एक कोटी रुपयांचे अनुदान देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
एका शिवारातील संलग्ण भौगोलीक क्षेत्र असलेल्या 20 शेतकऱ्यांनी किमान शंभर एकर शेती गट शेती करण्यासाठी एकत्र येऊ शकतात. या गटांची कंपनी अधिनियमन नुसार शेतकरी उत्पादक गट किंवा कंपनी म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. गटातील सर्व शेतकऱ्यांचे आधार क्रमाक बॅंक खात्याशी जोडण्यात येणार आहे. प्रयोगिक तत्वावर करण्यात येणाऱ्या या शेतीमध्ये सामुहीक सिंचन सुविधा, शेततळे, सुक्ष्म सिंचन, खासगी विहीर घेणे, पंपसेट, पाईपलाईन बसवून सुक्ष्म सिंचन करून आटॉमाईजेशन करणे, यांत्रिकीकरणाद्वारे मशागत करणे, लहान शेती यंत्रे पिक संरक्षक सयंत्रे इत्यादी गोष्टी सहजपणे करता येणार आहे. याशिवाय सामुहिक गोठा, दुग्ध प्रक्रिया औजारे, मत्स पालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, कुकुटपालन आदी जोड व्यवसाय सुरू करता येणार आहे.
गटशेतीसाठी निधीचे वितरण तीन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 20 टक्के निधी गटाची निर्मिती, नोंदणी, बॅंक जोडणी व समूह विकास आराखडा तयार करणे व प्रशिक्षण यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रकल्प किंमतीच्या 30 टक्के निधी सामुहिक सिंचन व्यवस्था निर्माण करणे, यांत्रिकीकरण करणे, औवजारे बॅंक व पशुधन या खर्चासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातही 30 टक्के निधी सामुदायीक संकलन, प्रतवारी, साठवणूक व प्रक्रीया केंद्राची निर्मिती व विपणन व वाहतूक यासाठी खर्च करण्यात येणार आहे. तर शेवटच्या टप्प्यामध्ये प्रकल्प किमतीच्या 20 टक्के निधी मंजूर आराखड्याप्रमाणे झालेल्या कामाचे मूल्यमापन करून अंतिम हप्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राव यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजना सुरू केली आहे. खरीप हंगामासाठी योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे 77 हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. आतापर्यंत फक्त तीन हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे जास्ती जास्त शेतकरी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राव यांनी येथे केले.
गटशेतीसाठी २०० कोटींची तरतूद
Tuesday, 17 Oct, 1.57 am
लोकमत न्यूज नेटवर्क जाफराबाद : गटशेतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी राज्य शासनाने गटशेती योजना तयार केली असून, त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे १४६ व्या द्वादश कार्यक्रमानिमित्त गटशेती करणा-या शेतक-यांचा मेळावा आणि गटशेती पाहणी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, सीईओ दीपक चौधरी, फळबाग शास्त्रज्ज्ञ डॉ.भगवान कापसे, जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, तालुका अध्यक्ष गोविंदराव पंडित, सभापती साहेबराव कानडजे, चेरमन विजयनाना परिहार, जि.प.
शालिकराम म्हस्के, संतोष लोखंडे, आशा पांडे, तुकाराम जाधव, शिवाजीराव थोटे, सुरेश दिवटे, मुकेश चिने, नाना भागिले, सुधीर पाटील, प्रदीप मुळे, दत्तू पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की गटशेती ही काळाची गरज आहे. जालना जिल्ह्यातील गटशेतीचे मॉडेल राज्य शासनाने स्वीकारले असून, गटशेती करणा-या शेतक-यांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कृषी योजनांचा लाभ दिला जाईल. १८ आॅक्टोबरपासून कापूस उत्पादक शेतक-यांसाठी शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
सुरुवातीला नोंदणी करून टोकन पद्धतीने कापूस खरेदी करून घेतला जाईल. त्यामुळे शेतक-यांनी व्यापाºयांना कापूस न देता शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर द्यावा. गटशेती प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी माहिती दिली.
या वेळी खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ.संतोष दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गटशेती करणारे चांगुणाबाई बाळू कापसे यांच्या शेतातील शेत तळे, द्राक्ष बागेची पाहणी केली. जीवरेखा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-यामध्ये अडविण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
तसेच राजूर ते टेंभूर्णी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन झाले. उद्धव दूनगहू यांनी सूत्रसंचालन केले तर गोविंदराव पंडित यांनी आभार मानले.
सुरुवातीला नोंदणी करून टोकन पद्धतीने कापूस खरेदी करून घेतला जाईल. त्यामुळे शेतक-यांनी व्यापाºयांना कापूस न देता शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर द्यावा. गटशेती प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी माहिती दिली.
या वेळी खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ.संतोष दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गटशेती करणारे चांगुणाबाई बाळू कापसे यांच्या शेतातील शेत तळे, द्राक्ष बागेची पाहणी केली. जीवरेखा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-यामध्ये अडविण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
तसेच राजूर ते टेंभूर्णी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन झाले. उद्धव दूनगहू यांनी सूत्रसंचालन केले तर गोविंदराव पंडित यांनी आभार मानले.
संपर्क,
कृषी सल्हागार व
महाराष्ट्र हेड किसान स्पेस टिम इंडिया
मो.8483900161
आमचा हा नंबर आपल्या वाटस अँप गृप ला अँड करा आणि अशा ताजी माहिती मिळवत रहा आपल्या वाटस अँफवर घरबसल्या.हा मेसेज सर्व शेतकऱ्यांना पाठवा.धन्यवाद
कितो टकके सबसिडी आहे विस्रुत माहीती मिळावी
ReplyDeleteसोलापुर जिल्ह्यासाठीच्या आधिकार्याचा नंबर द्या
ReplyDeleteसोलापुर जिल्ह्यासाठीच्या आधिकार्याचा नंबर द्या
ReplyDeleteकितो टकके सबसिडी आहे विस्रुत माहीती मिळावी
ReplyDeleteAk 20 shetkarya kade 100 yekar sheti ahe ka ?
ReplyDeleteJana kami sheti ahe tyani kay karave .
Tyancha sathi kahi yojna ahe ka pls sangave ∆
Ak 20 shetkarya kade 100 yekar sheti ahe ka ?
ReplyDeleteJana kami sheti ahe tyani kay karave .
Tyancha sathi kahi yojna ahe ka pls sangave ∆
सर जालना जिल्ह्यासाठी आहे का हि योजना
ReplyDeleteहिंगोली जिल्हा साठी माहिती द्यावी
ReplyDeleteकुठ apply करायचं
ReplyDelete